offline application

मराठी शाळेच्या विकासात ऑफलाईन अॅप्स टेक्नोलॉजीचा वापर

प्रोजेक्टर :- लक्ष्मण कुंडलिक वाठोरे (Web.Eng) प्रथम नियुक्ती :- विद्या मंदिर मालाईवाडा, पो- येळण जुगाई, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर, नौकरी सुरु दिनांक :-२०.०६.२००६ ते २४.०८.२०१५ पर्यंत. द्वितीय नियुक्ती:- केंद्रिय प्राथमिक शाळा माण, ता.शाहूवाडी जिल्हा-कोल्हापूर येथे विषय शिक्षक पदावर हजर दिनांक :-२५.०८.२०१५ ते पुढे सेवेत....

शिक्षण क्षेत्रात संगणकिय ज्ञानाच्या जोरावर नव-क्रांती. जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या व पुढील काळाची गरज ओळखून सन-2002 व 2004 या कालावधीत शिक्षण क्षेत्रातील D.ed ही पदविका अभ्यासक्रम पूर्ण करीत असतांना Diploma in computer पदविका अभासक्रम पूर्ण करून सन-2006 मध्ये प्रत्यक्ष शिक्षण सेवेत कार्यतत्पर. पुढे MKCL- Besic computer courses, MBTB - Desk Top Publishing with office Automation, Diploma in web designing आदी पदविका प्राप्त. पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकच्या सहकार्यातून माहिती तंत्रज्ञान मध्ये html.css व java भाषेवर प्रभुत्व संपादन. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत B.A.(Marathi) व B.A. (Eng.) मुक्त विद्यापिठा मार्फत शिक्षण पूर्ण . सध्या ते udemy.com व iversity.org ई-लर्निग द्वारे वेबसर्वर व सॉफ्टवेअर संदर्भातील इतर भाषेवर वेब इंजिनिअरिंग अध्ययन.

शिक्षण प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी विविध ऑनलाइन साईटस व ऑफलाइन अॅप्लिकेशन तयार करून दिशा देण्याचे काम. महाराष्ट्रातील मराठी शाळेच्या विकासासाठी पहिली गुगल ब्लॉगसाईट www.adarshshala.blogspot.in तयार करून अनेक शिक्षक-विद्यार्थी, शैक्षणिक, सामाजिक व्यावसायिक, सेवा भावी मंडळे यांना मार्गदर्शन करून अनेक विनामूल्य प्रोजेक्ट महाराष्ट्र स्तरावर तयार करण्यसाठी कार्यतत्पर. adarshshala या प्रोजेक्ट अंतर्गत सध्या इंग्रजी विषयावर संशोधन करून इंग्रजी भाषेसाठी सारणी पद्धतीचा वापर करून शिक्षक –विद्यार्थी व समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींना इंग्रजी संभाषण कौशल्य प्रभुत्व मिळवण्यासाठी महाराष्ट्रतील मराठी शाळेच्या विकासातले पहिले ऑफलाइन र्अॅप्लिकेशन “आदर्श इंग्रजी” साईज फक्त 623kb हे AppGeyser ह्या सर्वरची मदत. हे अप्लिकेशन आदर्श शाळा या गुगल ब्लॉगसाईट द्वारे विनामूल्य प्राप्त करता येते. सध्या हे अॅप्लिकेशन लाखो शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गाने लाईक.

दुसरे प्रसिद्ध ऑफलाईन अॅप्लिकेशन सातारा येथील बालाजी जाधव यांच्या साईटसाठी इयत्ता ४ थी शिक्षक-विद्यार्थी यांना सर्व विषय प्रश्न संच मार्गदर्शन यासाठी विनामूल्य तयार करून देण्यात आले आहे.. हे ऑफलाईन अॅप्लिकेशन बालाजी जाधव या साईटवरून लाखो शिक्षकांनी प्राप्त केले आहे.

मूळगावं:- वाशीम जिल्हातील रिसोड तालुक्या मध्ये मसलापेन आहे. सन-2006 पासून कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण सेवेत कार्यतत्पर गेली ४ वर्ष उन्हाळी सुट्टीमध्ये मूळगावी न जाता सतत इतरांना विनामूल्य सहकार्य व मदत करण्यासाठी कार्यतत्पर. शासन स्तरावरील अनेक कार्यशाळा मध्ये पाठ्यपुस्तक हे साध्य नव्हे साधन आहे अशी शिक्षकांन मध्ये चर्चा होत असते हा विचार लक्षात घेऊन पाठ्यपुस्तक साध्य करण्यसाठी सन २०१५ या उन्हाळी सुट्टी मध्ये शासन स्तरावरील अनेक प्रशिक्षणात प्रत्यक्ष सहभागी होऊन विद्यार्थी दप्तर भार हलका करण्यसाठी शिक्षक-विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शक ठरणारे इयत्ता ४ थी प.अ.-२ विषय इतिहास यावर महाराष्ट्रतील मराठी शाळेच्या विकासातले छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र संदर्भ साहित्यचे तिसरे ऑफलाइन अॅप्लिकेशन आदर्श राजा’ साईज फक्त 755kb तयार करण्यात आले आहे. हे अॅप्लिकेशन आदर्श शाळा या ब्लॉगसाईटद्वारे व राज्य तंत्रस्नेही शिक्षक साईटस सहकार्यने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक-विद्यार्थी व पालकांनसाठी विनामुल्य उपलब्ध करण्यात आले आहे.

हे सर्व अप्लिकेशन विना इंटरनेट वापर करता येतात तसेच आदर्श राजा ह्या ऑफ लाईन अप्लिकेशन द्वारे संपूर्ण महाराष्ट्रील तंत्रस्नेही शिक्षकांच्या साईट संकलीत आहेत यामुळे कमी साईज मध्ये शिक्षक-विद्यार्थी व पालक यांना android मोबाईल द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या भावना कल्पना,विचार एकत्र समायोजन मिळणार आहे.

अनेक तंत्रस्नेही शिक्षकांना विनामूल्य ब्लॉगिंग विकासात मदत. शिक्षक -विद्यार्थांसाठी अध्ययन-अध्यापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी आदर्श शाळा ब्लॉगसाईट मध्ये e-books library द्वारे मातृभाषेतील विकाससाठी प्रथम भाषा पद्धती, मानसशास्त्रातील शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन पद्धती व विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता विकाससाठी शैक्षणिक मूल्यमापन, उपक्रम व कृतीसाठी कार्यानुभव विषयाचे अध्ययन पद्धती, आरोग्य विकाससाठी शालेय आरोग्य शिक्षण पद्धती, वर्ष २००२-०४ पासून माहिती तंत्रज्ञान विषयाचे प्रत्यक्ष अध्ययन व अध्यापन करून या पद्धतीचा विकास करण्यात आला आहे. सध्या पुढील संशोधन विद्यार्थी दप्तर ओझे कमी करणे या प्रकल्पासाठी कार्यतत्पर. तेसच डाऊनलोडसाठी १ ते ८ वी सर्व माध्यमातील सर्व विषयाची पी.डी.एफ पुस्तके व महारष्ट्र शासन सर्व वेबसाईट, सर्व जिल्हे, महाराष्ट्र, भारत, आशिया, जागतिक स्तरावरील सर्व साईटस, स्पर्धा परीक्षा व इतर सर्व ई-बुक्स सामान्यज्ञानाचे संयोजन.

या प्रोजेक्टसाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब, महाराष्ट्रराज्य शिक्षण आयुक्त मा. डॉ. भापकर साहेब, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे शिक्षण संचालक मा. श्री. एन. के. जरग साहेब, शिक्षण संचालक प्राथमिक मा. श्री. महावीर माने साहेब राज्यातील ATF व TST ग्रुप महाराष्ट्र राज्य शिक्षक admin panel मधील सर्व शिक्षक बंधू -भगिनी तसेच कोल्हापूर जिल्हा व शाहूवाडी तालुक्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक समाजातील सर्व स्तरावरील व्यक्ती या सर्वांचे प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे.

मनोगत:- शैक्षणिक गुणवत्ता विकासातून विद्यार्थांचे भविष्य घडवण्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तीचे सुप्त गुण सॉफ्टवेअर निर्मितीतून माहिती तंत्रज्ञान आधारे एकत्र समायोजन करण्यसाठी माझ्या संगणकीय ज्ञानाचा उपयोग होईल, जीवन जगत असतांना माणसांने नव-नविन शिकण्याचा प्रयत्न करावा. यासाठी जिद्द व चिकाटी बाळगल्यास नव-निर्मिती होते.