Monday, 19 November 2012

सुरक्षितता घटक : २४. इयत्ता : ४ थी. विषय: नागरिकशास्त्र

 ===========================================================
http://adarshshala2.hpage.com/ आदर्श शाळा http://adarshshala2.blogspot.in/

मागील पाठात  आपण आपल्या मिळणाऱ्या काही सोई –सुविधांविषयी
व त्यांचा जबाबदारीने वापर करण्याविषयी माहिती घेतली.या पाठात
आपण आपल्या सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे,हे समजावून घेणार
आहोत.
आपण थोडे सावध राहिलो आणि आपली काळजी घेतली,तर
आपल्याला इजा होण्याची शक्यता कामी असते.निष्काळजीपणे वागल्याने
आपल्याला व इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो .आपल्याला
व इतरांना कोणतीही शारीरिक इजा होणार नाही,अशा प्रकारे आपले
रोजचे व्यवहार करणे म्हणजे सुरक्षितता बाळगणे होय,सुरक्षितता
बाळगल्याने आपल्याला आपले स्वास्थ टिकवता येते.खेळण्या-
बागडण्यात किंवा शाळेत जाण्यात व्यत्यय येत नाही .परीक्षा बुडत नाही.
रोजच्या दिनक्रमात अडथळे येत नाहीत.
घरातील सुरक्षितता : घरात आपल्या उपयोगाच्या अनेक वस्तू
असतात.उदाहरणार्थ ,सुरी,कात्री ,विळी ,सुई ,अन्य धारदार वस्तू या
सर्व वस्तू वापरतात आपले पूर्ण लक्ष या वस्तू वापरण्यावर असावे.या
वस्तू वापरून झाल्या,की त्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या.मोठ्या माणसांच्या
देखरेखीखालीच या वस्तू वापराव्या .या वस्तू चुकीच्या पद्धतीने
हाताळल्यास आपल्याला इजा होऊ शकते.
मिक्सर,इस्त्री.फ्रीज,कुलर,शेतीसाठी पाण्याचा पंप (मोटार )
इत्यादी विजेची उपकरणे आपण वापरतो.कोणतेही विजेचे उपकरण ,ते
कसे वापरायचे याची माहिती अगोदर करून घेऊनच वापरावे.
विहीर ,नदी ,तलाव,समुद्र इत्यादी ठिकाणी पोहतांना आपण स्वत:ची
काळजी घेतली पाहिजे.पावसाळ्यात पुलांवरून प्रवास करताना व
होडीमधून प्रवास करताना काळजी घेतली पाहिजे.
घरात आपल्याबरोबर आपले भाऊ ,बहिण व आपल्या वयाचे अन्य
नातेवाईकही राहतात.काही कुराबुरींसाठी भांडण करू नये.भांडण झाल्यास
थोड्या वेळाने एकमेकांशी बोलून पुन्हा आपली गट्टी जमवावी.कोणताही
शारिरीक इजा होईल असे करणे टाळावे.म्हणजे सर्वांनाच सुरक्षितपणे
राहता येईल.
घरातील सुरक्षिता : आपल्या शरीराला इजा केवळ घरातच
होते असे नाही.घराबाहेरही इजा पोहचवणाऱ्या अनेक बाबी असू शकतात.
आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्याला रहदारीला सामोरे जावे लागते.
रहदारीतील सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची आहे,कारण गेल्या काही
वर्षांत वाहनांची संख्या खूप वाढली आहे.रहदारी सुरळीतपणे चालावी,
म्हणून अनेक नियम केलेले आहेत.या नियमांचे पालन केल्यास अपघात
होणार नाहीत.बस,रेल्वे इत्यादींमध्ये चढताना व उतरताना काळजी
घ्यावी .धावणाऱ्या वाहनात कधीही प्रवेश करू नये व उतरू नये.
अपघातात झाल्यास त्यात सापडलेल्या व्यक्तींना मदत करावी.
रहदारीचे काही नियम :
१.वाहनाचा वेग मर्यादित असावा.
२.वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये.
३.परवाण्याशिवाय वाहन चालवू नये.
४.पादचारी मार्गावरून चालावे.
५.पांढऱ्या पट्ट्यावरून रस्ता ओलांडावा.
सार्वजनिक ठिकाणी घायावाची काळजी : घराबाहेर वावरताना
तुम्ही अधिक सावध असले पाहिजे .अनोळखी व्यक्तीबरोबर जाऊ नये.
चॉकलेट किंवा अन्य भेटवस्तू अनोळखी व्यक्तींकडून घेऊ नयेत .बेवारस
पडलेल्या वस्तू कितीही आकर्षक दिसल्या तरी त्या उचलू नयेत,कारण
त्यातून आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.खूप गर्दीच्या
ठिकाणी शक्यतो जाण्याचे टाळावे ,कारण चेंगराचेंगरी जीवघेण ठरू
शकते.सुरक्षितता जपण्यासाठी पोलिसांची व अन्य मोठ्या माणसांची
मदत घ्यावी.अफवांवर विश्वास ठेवू नये.
सणवार ,उत्सव आणि समारंभ साजरे करतानाही आपल्याला
सुराक्षतेता विसर पडू नये.फटाके वाजवताना व दिव्यांची आरास
करताना काळजी घ्यावी.मिरवणुकीत व अन्य उत्सवांत हजारो लोक
एकत्र येतात.काही लोक अशा ठिकाणी उपद्रव निर्माण करतात.अशा
वेळी पोलीस सुरक्षितता जपण्याचा प्रयत्न करतात.त्यांना आपण मदत
केली पाहिजे .सार्वजनिक ठिकाणी शिस्त बाळगावे आपल्यालाच फायद्याचे
असते.
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण : आपण दिलेल्या करांतून बस,
रेल्वे ,बागा,वाचनालये ,रस्ते ,पूल अशा विविध सुविधा आपल्याला
मिळतात.या बाबी सर्वांच्या मालकीच्या असतात,म्हणून त्यांना सार्वजनिक
मालमत्तेचे जतन व संरक्षण केले पाहिजे.
ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण : आपला देश जगातील सर्वात प्राचीन
देशांपैकी एक आहे.आपल्याला देशात अनेक किल्ले,लेणी ,स्तूप ,स्मारके
व प्रर्थांनास्थळे आहेत.या वास्तू आपल्या देशाची संपत्ती आहे,म्हणूनच
तिचे जतन व रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
आपत्ती व्यवस्थापन : नैसर्गिक आपत्तीच्या काळात म्हणजे पूर
आल्यास किंवा भूकंप झाल्यास काय केले पाहिजे,याची माहिती
वडीलधर्यांकडून करून घ्यावी.संकटाच्या काळात घाबरून गेल्यास
काय करावे सुचत नाही व त्यामुळे असुरक्षितात वाढते.आपत्तीच्या
काळात करायच्या उपयोजनांना आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात.
त्याविषयाची माहिती आपल्या शाळेतही मिळते.
आपला स्वत:च्या आणि सर्वच लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करणे,
त्यासाठी उपययोजना करणे व सुरक्षितेबाबत सदैव जागरूक असणे हे
सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.
उपक्रम :
१.रहदारीचे नियम मोठ्या अक्षरांत लिहून ते वर्गात लावा.
२.आपत्ती व्यवस्थापना शिक्षकांच्या मदतीने अधिक माहिती मिळवा.
====================================================
आपले सामाजिक व शैक्षणिक नव-उपक्रम खालील ई-मेल वर पाठवा ते जनमत प्रणालीतून
विनामुल्यATM UTMमध्ये समाविष्ट केले जातील.
====================================================
            आपले अधिकारी सहकार्य जि.प.कोल्हापूर माहिती                                 http://www.zpkolhapur.gov.in/adhikari.php
====================================================
      शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन प्रगती प्रपत्र माहिती:-
              http://pragatienthrall.cloudapp.net/kolhapurzp.aspx
====================================================
http://adarshlink.blogspot.in/ आदर्श शाळा http://adarshshala21.blogspot.in/                         
=====================ई-मेल संपर्क==========================
 laxmanwathore@gmail.com
 laxmanwathore@yahoo.com
 laxmanwathore@rediffmail.com
====================फेसबुक संपर्क==========================
http://www.facebook.com/#!/adarsh.shala?sk=wall
================== मोबाईल संपर्क============================
Contact only sunday- 9403876784
====================================================== 

नागरी सुविधा देणाऱ्या संस्था घटक : २३.इयत्ता : ४ थी. विषय: नागरिकशास्त्र

===========================================================
http://adarshshala2.hpage.com/ आदर्श शाळा http://adarshshala2.blogspot.in/
===========================================================
 ==========================================================
नागरी सुविधा देणाऱ्या संस्था  घटक : २३.इयत्ता : ४ थी. विषय: नागरिकशास्त्र
===========================================================
   मागील पाठात आपण आपल्या परिसरातील विविध प्रकारच्या सेवा
देणाऱ्या संस्थांविषयी माहिती घेतली. या पाठात आपण आपल्याला
नागरी सुविधा  देणाऱ्या काही संस्थांची ओळख करून घेणार आहोत.
नागरी सुविधा : दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी सर्व
लोकांना ज्या सोई उपलब्ध करून दिल्या जातात,त्या सोईंना नागरी
सुविधा म्हणतात.उदाहरणार्थ,पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी,
प्रवासासाठी रेल्वे किंवा बसगाड्या ,रस्ते ,पूल, खेळण्यासाठी मैदाने,
व्यायामशाळा इत्यादी .काही आपत्ती आल्यास तिच्यापासून आपला
बचाव व्हावा म्हणूनही काही सोई असणे आवश्यक असते.आग लागल्यास
ती विझवण्यासाठी अग्निशमक यंत्रणा असावी लागते.बाहेरगावी किंवा परदेशात असणाऱ्या आपल्या नातेनाईकांना आपली खुशाली कळवण्यासाठी
संपर्कांच्या साधनांची आवश्यकता असते.या व अशा स्वरूपाच्या सुविधा
आणि सोईंमुळे आपल्या दैनंदिनी जीवनातले कष्ट तर कमी होतातच,पण
त्याचबरोबर आपल्याला सुखाचे व समाधानाचे जीवन जगता येते.
शैक्षणिक संस्था : आपल्या सर्वांना शाळेत जायला ,अभ्यास
करायला खूप आवडते.शाळेत आपण रोज काहीतरी नवे शिकतो.
नवनवे शिकवण्यातून आपल्याला उमेद येते,उत्साह वाटू लागतो.स्वतंत्रपणे
विचार करण्याची सवय होऊ लागते.आपला आत्मविश्वास वाढतो.
आपल्या परिसरात शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा व संस्था असतात.
त्याशिवाय सुतारकाम,वीजजोडणी ,शिवणकाम,संगणक दुरुस्ती ,नळ
दुरुस्ती इत्यादी कामे शिकवणाऱ्या तांत्रिक शाळाही असतात.आपल्या
आवडीनुसार मोठेपणी अशा शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेऊन एखादे कौशल्य
आपण मिळवू शकतो.समाजाच्या उपयोगी पडणारे कोणतेही काम श्रेष्ठ
किंवा कनिष्ठ दर्जाचे नसते.सर्व प्रकारच्या श्रमांना समान प्रतिष्ठा असते.
आरोग्य केंद्रे: प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारांवर व अपघातांवर
प्राथमिक उपचार होतो.आपल्या राज्याच शहरी व ग्रामीण भागांत अशा
प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या मोठी आहे.साथीच्या आजारांना आळा
घालणे,आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणती काळजी घेतली.
पाहिजे,याबाबतचे शिक्षणही ही आरोग्य केंद्रे देतात.
उत्तम आरोग्य हे आपल्याला
व आपल्या सामुहिक जीवनाला
फायद्याचे असते.निरोगी लोक
देशाचे सामर्थ्य वाढवू शकतात.
आजारांच्या उपचारांवर होणारा
खर्च आपण वाचवू शकतो.
आपले आरोग्य चांगले ठेवणे ही
आपली जबाबदारी असते.
आपल्या परिसरातील आरोग्याच्या
सुविधा आपल्या भल्यासाठी
आहेत,हे आपण जाणले पाहिजे.
आपण आजारी पडलो की आपली शाळा बुडते,मित्रमैत्रिणीबरोबर
खेळता येत नाही,एखादा समारंभ असले तर त्याला जाता येत नाही,
म्हणून आपण शक्यतो आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न
करावा.पोष्टिक अन्न खावे,व्यायाम कराव,शारीरिक श्रमाची कामे
करावी .वैयक्तिक स्वच्छता ठेवावी.
दळववळणची साधने : दळणवळनाच्या साधनांत वाहतुकीची
साधने व संपर्क साधने यांचा समावेश होतो.आपल्या नातेवाईकांना किंवा
मित्रमैत्रींणींना आपण दररोज भेटू शकत नाही; परंतु त्यांना काही सांगण्याची ,
त्यांच्याकडून काही ऐकण्याची आपल्याला गरज वाटते आणि उत्सुकताही !
दूरवर असणाऱ्या लोकांशी कसा संपर्क ठेवायचा हा आपला प्रश्न
दळवळणाची साधने सोडवतात.सुट्टीच्या काळात तुम्ही प्रवास करता.
बस,रेल्वे,विमान ही प्रवासाची केला जातो.गेल्या काही वर्षांत दळणवळणाच्या या
साधनांमध्ये फार मोठी प्रगती झाली आहे.त्यामुळे आपल्याला राज्यात
आणि देशातच नव्हे,तर जगाच्या कोणत्याही भागात आता सहज जाता
येते.संपर्कांची साधने : तुमच्या नावाचे पत्र तुमच्या हाती पडले,की तुम्हांला आनंद वाटतो ना ? कारण पत्रातून तुम्ही मित्र मैत्रिणींशी
बोलतच असता.पात्रांची ही देवाणघेवाण कोण करते ? तर अर्थातच
टपालखाते.प्रत्येक गावात टपालाची देवाणघेवाण करणारे असे कार्यालय
असते.आजच्या काळात संपर्कासाठी टपालाबरोबरच संगणकाचीही मोठ्या
प्रमाणावर वापर केला जातो.अगदी कमी वेळात तुमचे पत्र पोहोचणे
आता शक्य झाले आहे.दळणवळणाच्या सोईंमुळे आणि संपर्कांच्या
साधनांमध्ये वाढ झाल्याने आपले सामुहिक जीवन अधिक आनंददायी
झाले आहे.
नागरी सुविधा सर्व लोकांसाठी असतात.आपले शासन आपल्याला
कोणत्या नवनवीन सुविधा देत आहे,याचीही माहिती आपण
घेतली पाहिजे .तुम्हांला या सुविधांचा योग्य वापर करून एक सुजाण
नागरिक होता येईल .
उपक्रम :
१.इंटरनेट,ई-मेल ,फोन ही संपर्क साधने कशी हाताळावी,याची
माहिती शिक्षकांकडून ,पालकांकडून करून घ्या.
२.श्रमप्रतिष्ठा ‘ या विषयावर शिक्षकांच्या मदतीने अधिक माहिती मिळावा.
====================================================
आपले सामाजिक व शैक्षणिक नव-उपक्रम खालील ई-मेल वर पाठवा ते जनमत प्रणालीतून
विनामुल्यATM UTMमध्ये समाविष्ट केले जातील.
====================================================
            आपले अधिकारी सहकार्य जि.प.कोल्हापूर माहिती                                 http://www.zpkolhapur.gov.in/adhikari.php
====================================================
      शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन प्रगती प्रपत्र माहिती:-
              http://pragatienthrall.cloudapp.net/kolhapurzp.aspx
====================================================
http://adarshlink.blogspot.in/ आदर्श शाळा http://adarshshala21.blogspot.in/                         
=====================ई-मेल संपर्क==========================
 laxmanwathore@gmail.com
 laxmanwathore@yahoo.com
 laxmanwathore@rediffmail.com
====================फेसबुक संपर्क==========================
http://www.facebook.com/#!/adarsh.shala?sk=wall
================== मोबाईल संपर्क============================
Contact only sunday- 9403876784
======================================================

आपल्या सामाजिक संस्था घटक : २२.इयत्ता : ४ थी. विषय: नागरिकशास्त्र

===========================================================
http://adarshshala2.hpage.com/ आदर्श शाळा http://adarshshala2.blogspot.in/
===========================================================
===========================================================
आपल्या सामाजिक संस्था घटक : २२.इयत्ता : ४ थी. विषय: नागरिकशास्त्र 
===========================================================
मागील पाठात आपण आपल्या गरजा व त्या कशा पूर्ण होतात
याची माहिती घेतली.सण-समारंभ आणि उत्सवांतून दिसणाऱ्या आपल्या
संस्थांची ओळख करून घेणार आहोत.
समाज : समूहात राहणे आपल्याला आवडते.ती आपली गरज
असते.जवळच्या किंवा दूरवर राहणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या कारणाने
आपल्याशी जोडलेल्या असतात.परस्परांशी देवघेव करणारा,एकमेकांमध्ये
संपर्क असणारा व साधारणत :सारखे हेतू असणारा लोकांचा समुदाय
म्हणजे ‘समाज’होय.समाजातील व्यक्तींमध्ये परस्पर संबंध असतात.
समाजाचा आपल्याला मोठ्या आधार असतो.
सामाजिक संस्था : सारख्या आवडीनिवडी असणारे,सारखा
व्यवसाय करणरे किंवा काही समान हेतू बाळगणारे लोक एकत्र येऊन
संघटना स्थापन करतात.समाजाच्या उपयोगाचे काम करतात.अशा
गटांना सामाजिक संस्था म्हणतात.शिक्षण ,आरोग्य ,पर्यावरण ,आर्थिक
बाबी इत्यादींशी संबधित अनेक सामाजिक संस्था सातत्याने काम करत
असतात.सामाजिक संस्थांमुळे समाजाच्या प्रगतीला चालना मिळते.
सांस्कृतिक संस्था : गावातील किंवा शहरातील भजनी मंडळे ,
लोकसंगीत ,लोकनाट्य,साहित्य,शिल्पकला,नृत्य,क्रीडा इत्यादींशी
संबंधीत असणाऱ्या संस्थांना सांस्कृतिक संस्था म्हणतात.आपल्या
स्वत:च्या विकासासाठी ज्ञान व मनोरंजन यांची आवश्यकता असते.
सांस्कृतिक संस्थामुळे या गोष्टी आपल्याला मिळतात.समाजाची प्रगती
घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक संस्थांचा मोठा वाटा असतो.
सेवाभावी संस्था: नफा किंवा आर्थिक फायदा हे एकमेव उद्दिष्ट
न मानता,समाजाला उपयुक्त ठरतील अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या
संस्थांना सेवाभावी संस्था असे म्हणतात.तुमच्या परिसरात तुम्ही अशा
अनेक सेवाभावी संस्था पाहिल्या असतील.शेती,उद्योग,विज्ञानाचा
प्रसार,अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी क्षेत्रांत सेवाभावी संस्था काम करतात.
रक्तपेढ्या ,मोफत वाचनालये ,पाणपोया,व्यायामशाळा,रुग्णवाहिका
इत्यादी सुविधा सेवाभावी संस्था उपलब्ध करून देतात.
सहकारी संस्था : लोक परस्पर सहकार्याने किंवा व्यवसाय
निर्माण करतात.त्यातून मिळणारा नफा सर्वजण वाटून घेतात.सहकार्यावर
आधारलेल्या अश्या संस्थांना ‘सहकारी संस्था असे म्हणतात.तुमचा
परिसर बारकाईने न्याहळल्यास तुम्हांला अनेक सहकारी संस्था आजूबाजूला
असलेल्या दिसतील.केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता
काही लोक एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्यात पुढाकार
घेतात.
सहकारी संस्थांमुळे गावाचा विकास होतो.रोजगार निर्माण होतो.
आपले स्वावलंबन वाढते.गरिबी व मागासलेपणा दूर करता येतो.
आपल्या राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने,सूतगिरण्या ,दुध
संस्था आणि पतसंस्था आहेत.घरबांधणी क्षेत्रातही सहकारी संस्था असतात.
सहकारी संस्थामुळे प्रगतीला चालना मिळत आहे.
ग्राहक संरक्षण : आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला अनेक
वस्तूंची गरज असते.आपण त्या वस्तू बाजारातून विकत आणतो.
धान्य,भाजीपाला,दुध,रॉकेल,कपडे,इथपासून ते मोठ्या इलेक्ट्रॉनिक
वस्तूंपर्यंत खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही,याची आपण
काळजी घेतली पाहिजे.वस्तू विकत घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होऊ
नये,म्हणून शासनाने ग्राहकांना संरक्षण दिलेले आहे.त्यासाठी अनेक
आग्रह धारा .....................
१.उत्पादनांचे किंवा सेवांचे पुढील तपशील पाहून घ्या .
चिन्ह,सुरक्षा ,व दर्जा प्रमाणपत्र .(आयएसआय हॉलमार्क ,अग्मार्क इत्यादी )
२.खरेदीचे बिल जरूर घ्या.
३.सर्व खरेदीच्या पावत्या,हमीपत्रे व सूचना सुरक्षित
ठिकाणी ठेवा.
४.ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांसाठी आग्रह धरा व
उत्पादन \सेवा देणारे आपल्या तक्रारीचे निराकरण
करीत नसतील तर ग्राहक मंचाशी संपर्क साधा.
नियम व उपयोजना केल्या आहेत.बनावट वस्तूंची विक्री वजनकाट्याचा
गैरवापर ,वस्तूंच्या अवाजवी किंमती इत्यादी गोष्टी ग्राहकांची फसणूक
करणाऱ्या आहेत.अशी फसणूक झाल्यास आपल्याला स्थानिक ग्राहक
संरक्षण मंचाकडे तक्रार करता येते.
व्यक्ती आणि समाज यांना जोडण्यात सामाजिक संस्था महत्त्वाची
भूमिका बजावतात.सामाजिक संस्थांमुळे आपले सामाजिक जीवन अधिक
अर्थपूर्ण होते.
उपक्रम:
 तुमच्या परिसरातील एखाद्या सेवाभावी संस्थेचा कामाची ओळख करून घ्या .  
 ====================================================
आपले सामाजिक व शैक्षणिक नव-उपक्रम खालील ई-मेल वर पाठवा ते जनमत प्रणालीतून
विनामुल्यATM UTMमध्ये समाविष्ट केले जातील.
====================================================
            आपले अधिकारी सहकार्य जि.प.कोल्हापूर माहिती                                 http://www.zpkolhapur.gov.in/adhikari.php
====================================================
      शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन प्रगती प्रपत्र माहिती:-
              http://pragatienthrall.cloudapp.net/kolhapurzp.aspx
====================================================
http://adarshlink.blogspot.in/ आदर्श शाळा http://adarshshala21.blogspot.in/                         
=====================ई-मेल संपर्क==========================
 laxmanwathore@gmail.com
 laxmanwathore@yahoo.com
 laxmanwathore@rediffmail.com
====================फेसबुक संपर्क==========================
http://www.facebook.com/#!/adarsh.shala?sk=wall
================== मोबाईल संपर्क============================
Contact only sunday- 9403876784
======================================================

आपले सामुहिक जीवन घटक : २१. इयत्ता : ४ थी. विषय: नागरिकशास्त्र

===========================================================
http://adarshshala2.hpage.com/ आदर्श शाळा http://adarshshala2.blogspot.in/
===========================================================
===========================================================
 आपले सामुहिक जीवन घटक : २१. इयत्ता : ४ थी. विषय: नागरिकशास्त्र    
===========================================================
इयत्ता तिसरीच्या नागरिकशास्त्राच्या पाठांत आपल्या भोवती
असणाऱ्या परिसराची ओळख करून घेतली.आपल्या गावातील
ग्रामपंचायत,शहरातील नगरपरिषद,महानगरपालिका या स्थानिक
शासनसंस्था आपल्यासाठी काय करतात,आपल्याला कोणत्या सेवा
देतात यांविषयी माहिती घेतली.या पाठात आपण आपले सामुहिक
जीवन कसे असते,आपल्या गरजा कशा पूर्ण होतात हे समजावून घेणार
आहोत.
सामुहिक जीवन : आपण कुटुंबात जन्मतो,वाढतो.कुटुंबातील
सर्वजण आपल्याशी प्रेमाने वागतात.सर्वांच्या सहवासात आपल्याला खूप
सुरक्षित वाटते.प्रेम,आपुलकी आणि जिव्हाळा या सर्व गोष्टी आपल्या
कुटुंबात आपल्याला मिळतात.आपण जसजसे मोठे होऊ लागतो.तसतशा
आपल्या गरजाही वाढू लागतात.आपण खूप खेळावे ,सहलीला जावे,
समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगरदऱ्यांतून मुक्त भटकावे असे आपल्याला
वाटते.बस-रेल्वेतून प्रवास करावा.नवनवीन ठिकाणी पाहावी अशीही
आपली इच्छा असते.चित्र रेखाटणे ,पुस्तक वाचणे ,आकाश न्याहाळणे ,
पशूपक्ष्यांविषयी माहिती मिळवणे असे छोटे छोटे छंद जपण्याचा आपण
प्रयत्न करू लागतो.
मैत्री ,सोबत,साथसंगत इत्यादी बाबी आनंद देणाऱ्या वाटू लागतात.
एकमेकांच्या साथीचे आपण संगीत ,नाटक,नृत्य इत्यादींमध्ये रस घेऊ
लागतो.आपल्या कुटुंबात आपल्याला छंद जोपासायला उत्तेजन मिळते.
आपले  आई –वडिल व अन्य नातेवाईक त्यासाठी आपल्याला मदत
करतात; परंतु या सर्व गरजा केवळ कुटुंबात पूर्ण होत नाहीत.त्यासाठी
आपल्याला कुटुंबाबाहेरच्या मोठ्या परिसरात वावरावे लागते.कुटुंबाच्या
पलीकडे जाऊन आपण मोठ्या समूहाचा भाग होतो.आपले कुटुंब ,
आपले शेजारी यांच्यासह आपल्या परिसरातील लोकांबरोबर आनंदाने
राहणे म्हणजे सामुहिक जीवन होय.
आपल्या गरजा : आपल्याला अन्न,पाणी यांची आवश्यकता
असते,वस्त्र व निवारा याही आपल्या गरजा आहेत.आपले शरीर
निरोगी असले तरच आपल्याला चांगले जगता येते,म्हणून आरोग्य
टिकवण्यासाठी आवश्यक सोई आपल्याला मिळाल्या पाहिजेत.आपल्याला
नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात,म्हणून शिक्षण ही आपली गरज
होते,थोडक्यात अन्न,वस्त्र ,निवारा ,आरोग्य आणि शिक्षण या आपल्या
मुलभूत गरजा आहेत.या सर्व मुलभूत गरजांची पूर्तता कुटुंबामुळे आणि
आपल्या परिसरात असणाऱ्या सोई-सुविधांमुळे होते.आपल्या या सर्व
गरजा पूर्ण होण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात,म्हणून आपले
सामुहिक जीवन परस्परांवर अवलंबून असते.एकमेकांना सहकार्य केल्याने
आपल्याला चांगले जीवन जगता येते.अन्न,वस्त्र,निवारा इत्यादी
आपल्या आवश्यक गरजा आहेत,परंतु तेवढ्यातच आपल्या गरजा नसतात.
काहीतरी उत्तम कामगिरी करावी,आपल्याला मानसन्मान मिळावा
असे वाटणे ही सुद्धा आपली गरज असते.
आपले सांस्कृतिक जीवन : आपल्या घरात,शेजारी ,गावात
किंवा शहरात वेगवेगळे सण-समारंभ व उत्सव होतात.त्या प्रसंगी अनेक
लोक एकत्र येतात.आनंद व जल्लोस यांचा आपण अनुभव घेतो .
उत्सव व सण साजरे करणे,त्या निमित्ताने एकमेकांना भेटणे ,एकत्र येणे
यांतून आपल्यातील एकोपा वाढतो.
आपल्या परिसरात अनेक धर्मांचे लोक राहतात.आपण सर्व धर्मीयांच्या
सण –उत्सवांत सहभागी व्हावे.सर्व धर्मांचा ,भाषांचा आदर करावा.
आपल्या देशात आहार,वेशभूषा ,भाषा ,साहित्य,संगीत,नृत्य इत्यादी
बाबतींत विविधता आहे.आपण एकमेकांकडून वेगवेगळ्या भाषा,संगीत,
नृत्य इत्यदी शिकण्याचा प्रयत्न करतो.अन्य प्रदेशातील खाद्यपदार्थ
आवडीने शिकतो व ते आपल्या घरातही केले जातात.अशा देवाण-
घेवाणीमुळे आपल्यातील एक्यभावना वाढते.
कोणतेही सण –समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करताना
निसर्गाची हानी होणार नाही,याची आपण काळजी घेतली पाहिजे
झाडांच्या फांद्या तोडू नयेत किंवा कोणतीही नासधूस करू नये.नद्या,
तळी,समुद्रकिनारे स्वच्छ ठेवावे.आपल्या सर्व गरजा निसर्गामुळेच पूर्ण
होतात,म्हणून निसर्गाने दिलेल्या हवा,पाणी ,जंगले,नद्या ,पर्वत ,वन्य
पशु व पक्षी या सर्वांचा आपण आदर केला पाहिजे.
उपक्रम :
तुमच्या परिसरातील एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्या.त्यासाठी तुम्ही
कोणती तयारी केली,यांची मुद्देसूद माहिती लिहा.
====================================================
आपले सामाजिक व शैक्षणिक नव-उपक्रम खालील ई-मेल वर पाठवा ते जनमत प्रणालीतून
विनामुल्यATM UTMमध्ये समाविष्ट केले जातील.
====================================================
            आपले अधिकारी सहकार्य जि.प.कोल्हापूर माहिती                                 http://www.zpkolhapur.gov.in/adhikari.php
====================================================
      शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन प्रगती प्रपत्र माहिती:-
              http://pragatienthrall.cloudapp.net/kolhapurzp.aspx
====================================================
http://adarshlink.blogspot.in/ आदर्श शाळा http://adarshshala21.blogspot.in/                         
=====================ई-मेल संपर्क==========================
 laxmanwathore@gmail.com
 laxmanwathore@yahoo.com
 laxmanwathore@rediffmail.com
====================फेसबुक संपर्क==========================
http://www.facebook.com/#!/adarsh.shala?sk=wall
================== मोबाईल संपर्क============================
Contact only sunday- 9403876784
======================================================

स्फुतींचा जिवंत झरा घटक : २० इयत्ता : ४ थी. विषय: इतिहास

===========================================================
http://adarshshala2.hpage.com/ आदर्श शाळा http://adarshshala2.blogspot.in/
===========================================================
===========================================================
स्फुतींचा जिवंत झरा घटक : २० इयत्ता : ४ थी. विषय: इतिहास  
===========================================================
स्फूर्तिदाता : शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले,अशक्य
होते ते शक्य करून दाखवले,म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हापुन्हा सांगावेसे
वाटते आणि पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते.त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते.
मातृपितृभक्ती : शिवराय नेहमी मासाहेबांच्या आज्ञेत वागले.
मासाहेबांच्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केल्या.शहजीराजांविषयी
त्यांच्या मनात अपार आदर होता.एकदा शहाजीराजे त्यांना भेटायला
आले.शिवरायांना  खूप आनंद झाला.त्यांनी वडिलांना पालखीत
बसवले .त्यांचे जोडे आपल्या हातांत घेऊन पालखीबरोबर ते चालू
लागले.केवढी ही पितृभक्ति ! शहाजीराजे व जिजाऊ या थोर
मातापित्यांचे हिंदवी स्वराजाचे मनोरथ शिवरायांनी पूर्ण केले.
साधुसंतांचा आदर : शिवरायांची  कुलदेवता भवानीदेवी .तिच्यावर
शिवरायांची अपार भक्ती होती.ते साधुसंतांना फार मान देत.त्यांना
मंदिरे प्रिय होती.त्यांनी माशिदिंचेही रक्षण केले.त्यांना भगवद्गीता पूज्य
होती.त्यांनी कुराआन शरीफचाही मान राखला.ख्रिस्ती लोकांच्या
प्रर्थानामंदिरानाही ते जपत.शिवराय विद्वानांचा आदर करत.परमानंद ,
गागाभट्ट ,धुंडिराज,भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला.
तसेच संत तुकाराम ,समर्थ रामदास ,बाबा याकूत ,मौनीबाबा  इत्यादी
संताचाही त्यांनी बहुमान केला.सज्जनांना राखावे ,दुर्जनांना ठेचावे हा
शिवरायांचा बाणा होता.तो त्यांनी हयातभर पाळला.
स्वदेशाभिमान: शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते.धनदौलत
त्यांना कमी नव्हती,पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला.
आपल्या देशात आपले राज्य व्हावे,प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे
वागता यावे,सर्वांना सुखासमाधाने जगता यावे,मराठी भाषेला ,
स्वधर्माला मान मिळावा,यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूंशी झुंज देऊन
स्वराज्य स्थापन केले,स्वदेश ,स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी
ते आयुष्यभर झटत राहिले आणि अखेर यशस्वी झाले.शिवरायांना
मायबोलीचा अभिमान होता.राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत,
यासाठी त्यांनी राज्यव्यवहारकोश हा ग्रंथ तयार करून घेतला.
हिंदवी स्वराज्य : हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते.
हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे ; मग ते कोणत्याही धर्मांचे असोत,
कोणत्याही जातीचे असोत,त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य .
शत्रू बलाढ्य होते,पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही .काळ
कठीण होता,पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही.बादशाहाच्या बाजूने
लाखो लोक होते,पण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली .बलाढ्य
परकीय सत्तेपुढे ते कधीच नमले नाहीत.
शिवरायांचे आठवावे रुप: काळ्याकुटट अधांरात आपली
दिशा ठरवून वाट काढायची ; संकटे आली असता डगमगून न जाता
त्यांवर मत करून पुढे जायचे; बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने
झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे ; सहकाऱ्यांना उत्साह देत व
शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे –हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते.
आदर्श पुत्र,सावध नेता,कुशल संघटक ,लोककल्याणकारी प्रशासक,
हिकमती लढवय्या ,दुर्जनांचा कर्दनकाळ,सज्जनांचा कैवारी आणि एका
नव्या युगाचा निर्माता,असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी
तेजस्वी पैलू आहेत.हे सारे पाहिले,की पुन्हापुन्हा वाटते-
शिवरायांचे आठवावे रूप !
शिवरायांचा आठवावा प्रताप !!
उपक्रम :
शिवरायंचे एखादे छोटे चरित्र वाचा .
====================================================
आपले सामाजिक व शैक्षणिक नव-उपक्रम खालील ई-मेल वर पाठवा ते जनमत प्रणालीतून
विनामुल्यATM UTMमध्ये समाविष्ट केले जातील.
====================================================
            आपले अधिकारी सहकार्य जि.प.कोल्हापूर माहिती                                 http://www.zpkolhapur.gov.in/adhikari.php
====================================================
      शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन प्रगती प्रपत्र माहिती:-
              http://pragatienthrall.cloudapp.net/kolhapurzp.aspx
====================================================
http://adarshlink.blogspot.in/ आदर्श शाळा http://adarshshala21.blogspot.in/                         
=====================ई-मेल संपर्क==========================
 laxmanwathore@gmail.com
 laxmanwathore@yahoo.com
 laxmanwathore@rediffmail.com
====================फेसबुक संपर्क==========================
http://www.facebook.com/#!/adarsh.shala?sk=wall
================== मोबाईल संपर्क============================
Contact only sunday- 9403876784
======================================================

रयतेचा राजा घटक : १९. इयत्ता : ४ थी. विषय: इतिहास

===========================================================
http://adarshshala2.hpage.com/ आदर्श शाळा http://adarshshala2.blogspot.in/
===========================================================
 ==========================================================
रयतेचा राजा घटक : १९. इयत्ता : ४ थी. विषय: इतिहास 
===========================================================
रयतेच्या सुखासाठी : वडिलांकडून शिवरायांना केवळ लहानशी
जहागिरी मिळाली होती.या लहानशा जहागिरीतून त्यांनी ‘स्वराज्य’
निर्माण केले.लहानपणी त्यांनी लोकांचा छळ बघितला.त्यांनी लोकांना
जागे केले,स्वाभिमानी बनवले.त्यांनी लोकांची संघटना उभारली .
आपला जीव धोक्यात घातला व बलाढ्य शत्रूंचा पराभव करून
शिवरायांनी न्यायचे स्वराज्य निर्माण केले.त्या स्वराज्याची चोख
व्यवस्था लावली .त्यामुळे रयत सुखी झाली.
सेवकांवर माया : शिवरायांची आपल्या सेवकांवर मोठी माया
होती. बाजीप्रभूने देशासाठी मरण पत्करले ,शिवरायांनी त्यांच्या  मुलांचे
संगोपन केले.तानाजीने देशासाठी आत्मबलिदान केले,शिवरायांनी
स्वत: त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले.रायबाला आपल्या
मायेचे छत्र दिले.आग्र्याच्या कैदेत मदारी मेहतर याने आपला जीव
धोक्यात घातला,शिवरायांनी त्याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही.
प्रतापराव गुजर याने स्वराज्यासाठी आत्माहुती दिली.शिवरायांनी त्याच्या
मुलीचे लग्न आपल्या दुसरा मुलगा राजारामशी केले.अशा किती गोष्टी
सांगाव्या ! शिवराय राजे होते,पण आपल्या सेवकांची त्यांनी
पित्यासारखी काळजी घेतली .
रयतेचे रक्षण : शायीस्ताखान स्वराज्यावर चालून आला.त्या
वेळची गोष्ट.खानाची फौज पिके तुडवत,लोकांना त्रास देत,मुलूख
उद्ध्वस करत येऊ लागली .शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली.
त्यांनी आपल्या सरदारांना लिहिले,तमाम रयतेला घाटाखाली पाठवा.
जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना पाठवा.आळस करू नका.या
कामासाठी रात्रीचा दिवस करा.गावोगावी फिरा.लोकांना आसरा मिळवून
द्या.मुघलांनी लोकांना कैद केले तर ते पाप तुम्हांला लागेल.
शिवरायांनी आपल्या प्रजेवर अशी मातेसारखी माया केली.
चांगले ते केले : जुन्यातील वाईट टाकून आणि चांगले
निर्माण करणे,हा शिवरायांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता.
देशमुख ,देशपांडे,व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे.
त्यांना शेतकऱ्यांकडून शेतसारा ठरवून दिला.त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या
अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या.वतनदारी पद्धत बंद करण्याचाही
त्यांनी प्रयत्न केला,
कारण ही पद्धत स्वराज्याला घातक आहे,असे
त्यांचे मत होते. सुभेदारापासून कामावीसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख
पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरु केली.
कडक शिस्त : राज्यात कुठे काय चालले आहे,यांची शिवरायांना
खडनखडा माहिती असे,कारण त्यांचे हेरखाते चोख होते. फितुरीपासून
राज्याला धोका असतो, म्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली
होती.त्यांची शिस्त कडक होती.सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये,
रयतेला लुटू नये अशी सैन्याला सक्त ताकीद होती.नियमांचा भंग
करणाऱ्यांना ते कडक शिक्षा करत.
दिलदार शिवराय: शिवराय पराक्रमाने थोर होते, तसेच मनानेही
मोठे दिलदार होते .त्यांनी स्वराज्याच्या कामी सर्व जातीजमातींना जवळ
केले.सर्व जातीजामातींतील लोकांना स्वराज्याच्या कारभारात त्यांनी स्थान
दिले.धर्म ,जात न पाहता माणसाची योग्यता पाहून ते त्यास नोकरीला
ठेवत.शिवरायांच्या आरमारी दलात कोळी,भंडारी होते तसेच
मुसलमानही होते.महार,रामोशी इत्यादी मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या
कारभारात स्थान दिले होते.राज्यकारभाराचे काम त्यांनी ब्राम्हण व प्रभू
जमातींकडे सोपवले होते.शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होते, मराठे होते,
तसेच मुसलमानही होते.त्यांच्या पायादळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी
होता. त्यांच्या आरमारदलातील अधिकारी दौलतखान,सिद्दी मिसरी,
तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते.ते सारे
स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते.
मोहिमेवर असताना शिवरायांना मासिदिंना उपद्रव दिला नाही.कुराआन
शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक
मुसलमानांकडे सोपवून देत.लढाईत हाती लागलेल्या कोणाही स्त्रियांच्या
अब्रूस त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही.
उदार धार्मिक धोरण :शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते.
कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत.कोणी धर्म बदलला,
पण पुन्हा त्याला स्वत:च्या धर्मात परत यावे असे वाटले,तर ते त्याला
दूर लोटत नसत.बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता.
तो विजापूरच्या आदिलशाहाच्या चाकरीत होता.आदिशाहाने त्याला
स्वत:च्या धर्मात घेतले.बजाजी विजापुरात राहू लागला.त्याला काही
कमी नव्हते,पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला
खाई.त्याला वाईट वाटे.एके दिवशी तो स्वधर्मात परत आला,.तेव्हा
शिवरायांनी त्याला दूर लोटले नाही,त्याला जवळ केले.नेतोजी पालकर
याची हकीकतही अशीच आहे.नेतोजी पालकर याचा धर्म बदलला,पण
नंतर त्याला स्वधर्मात येण्यासाठी इच्छा झाली ,तेव्हा शिवरायांनी त्याला
दूर लोटले नाही.त्याला स्वधर्मात घेतले.त्याची हकीकत अशी –
नेतोजी पालकर : नेतोजी शिवरायाचा सेनापती होता.तो मोठा
चपळ आणि शूर होता,नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात.लोक
त्याला ‘प्रतिशिवाजी’ म्हणत .एक दिवस शिवरायांवर रुसून नेतोजी
मुघलांना जाऊन मिळाला.शिवराया आगऱ्याहून निसटून महाराष्ट्रात आले,
त्या सुमारास मुघलांनी दक्षिणेत नेतोजीस पकडून बादशाहाकडे पाठवले.
बादशाहाने त्याला आगऱ्यास पाठवले.नेतोजी आगऱ्याला गेला.
बादशाहाने त्याला मुसलमान केले.नेतोजी पालकर आता मुहम्मद
कुलीखान झाला.तो बादशाहाची चाकरी करू लागला.बादशाहाने त्याला
काबुलच्या मोहिमेवर पाठवले.तेथे त्याने पराक्रम गाजवला.दहा
वर्षे लोटली.एकदा बादशाहाने दिलेराखानाबरोबर नेतोजीला शिवरायांवर
पाठवले.तो दक्षिणेत आला.नेतोजीचे धर्मांतर झाले असले,तरी
शिवरायांना व महाराष्ट्राला तो विसरला नव्हता.त्याला आपले पूर्व
आयुष्य आठवले.त्याचे मन उंचबळून आले.त्याच्या मनात स्वराज्याची
व स्वधर्माची प्रीती जागी झाली.एक दिवस मुघलांच्या छावणीतून निघून
तो थेट शिवारायांच्याजवळ आला आणि म्हणाला, “ मी परधर्मात गेलो,
पण मला आता स्वधर्मात यायचे आहे.मला नाही का पुन्हा स्वधर्मात
येता येणार? शिवराय म्हणाले ,का नाही ? तुमची इच्छा असेल ,
तर तुम्ही पुन्हा स्वधर्मात येऊ शकाल. नेतोजी विनवणी करून
शिवरायांना म्हणाला ,मग मला हिंदू धर्मात घ्या.
शिवरायांनी शास्त्रीपंडितांची बैठक भरवली .ते म्हणाले ,पंडितहो !
मला धर्मात ढवळाढवळ करायची नाही,पण नेतोजी पालकरांना पुन्हा
स्वधर्मात यायचे आहे.त्यांना दूर लोटणे हा धर्म नाही .त्यांना जवळ
घेणे हा धर्म आहे. शिवरायांनी नेतोजी पालकराला पुन्हा स्वधर्मात
घेतले.पुढे नेतोजीने पुष्कळ वर्षे स्वराज्याची सेवा केली.
उपक्रम : शिवराय आणि त्यांचे सैनिक यांच्यातील संवादाचे नाट्यरूपांतर करा.
 ====================================================
आपले सामाजिक व शैक्षणिक नव-उपक्रम खालील ई-मेल वर पाठवा ते जनमत प्रणालीतून
विनामुल्यATM UTMमध्ये समाविष्ट केले जातील.
====================================================
            आपले अधिकारी सहकार्य जि.प.कोल्हापूर माहिती                                 http://www.zpkolhapur.gov.in/adhikari.php
====================================================
      शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन प्रगती प्रपत्र माहिती:-
              http://pragatienthrall.cloudapp.net/kolhapurzp.aspx
====================================================
http://adarshlink.blogspot.in/ आदर्श शाळा http://adarshshala21.blogspot.in/                         
=====================ई-मेल संपर्क==========================
 laxmanwathore@gmail.com
 laxmanwathore@yahoo.com
 laxmanwathore@rediffmail.com
====================फेसबुक संपर्क==========================
http://www.facebook.com/#!/adarsh.shala?sk=wall
================== मोबाईल संपर्क============================
Contact only sunday- 9403876784
======================================================

शिवरायांची युद्धनीती घटक : १८. इयत्ता : ४ थी. विषय: इतिहास

===========================================================
http://adarshshala2.hpage.com/ आदर्श शाळा http://adarshshala2.blogspot.in/
===========================================================
 ===========================================================
शिवरायांची युद्धनीती घटक : १८. इयत्ता : ४ थी. विषय: इतिहास
===========================================================
शिवरायांचे शौर्य व धैर्य : शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी
रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली.वयाच्या
पन्नासाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्या पस्तीस
वर्षांचा हा काळ ! या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व
मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापना केले.स्वराज्यासाठी ते
ह्यातभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वत:
लढाईत उतरले आणि त्यांनी  विजय मिळवले.त्यांचे आयुष्य
युद्धप्रसंगांनी भरलेले आहे.स्वराज्यावर अनेक संकटे आली,पण
शिवरायांनी प्रसंग पाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांना तोंड दिले.
शिवराय पराक्रमी होते, तसेच थोर मुत्सददीही होते.शक्ती कमी पडली
तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली.अफजलखान म्हणजे तुफान ताकदीचा
वीर,पण शिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली व त्याचा निकाल
लावला,धोधो पावसात व दाट काळोखात शिवराय सिद्दी जौहरच्या
वेढ्यातून बाहेर पडले.रात्रीच्या अंधारात शायीस्ताखानावर छापा घालून
त्यांनी त्याची खोड मोडली.आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून किती
युक्तीने ते निसटले!  त्यांच्यासारखा धाडसी आणि मुत्सद्दी सेनानायक
सापडणे कठीण !
सरदारांची स्वामीनिष्ठा : शिवराय स्वत: शूर योदधे होते.त्यांनी
आपल्या सरदारांना शूर बनवले.सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा
होती! शिवरायांना वाचवण्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभूने आनंदाने
मरणाला मिठी मारली .फिरंगोजी नरसाळा याने चाकणचा किल्ला
जीवावर प्राणार्पण केले.सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही
सरदार बहालोलखानाशी लढताना हौतात्म्य पत्करले.त्यांच्या सेवकांच्या
स्वामीनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
शिवरायांचा गनिमी कावा: शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते.
शत्रूजवळ अफाट फौजा होत्या,भरपूर दारुगोळा होता,शेकडो तोफा
होत्या,पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या
बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार ? उघड्या मैदानावर शत्रूशी कसा
सामना देणार ? तेव्हा शिवरायांनी विचार केला, की महाराष्ट्र हा डोंगराळ
मुलूख .इथे डोंगर ,घाट व खिंडी पुष्कळ आहेत.त्यांचा आपण भरपूर
उपयोग करून घेतला पाहिजे .हे सारे लक्षात घेऊन शिवरायांनी शत्रूशी
सामना कसा द्यावा हे ठरवले.शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर समान
असे .ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे.उलट मराठे
घोडेस्वारांजवळ जड समान काहीच नसे.पाठीला ढाल, कमरेला
तलवार,हातात भाला एवढेच त्यांचे सामान .पाहता पाहता ते डोंगर
चढत व उतरत .शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते.या साऱ्या
गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई
करण्याचे शक्यतो टाळले,यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते.
शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची
खडानखडा माहिती मिळवत.मग शत्रूवर अचानक हल्ला करत.बेसावध
शत्रूची दाणादाण उडवत.शत्रू लढाईत तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या
वेगाने दिसेनासे होत.डोंगराळ भागात अशा लपुनछपून लढाया करायला
शिवरायांनी सुरुवात केली.यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात.शिवरायांनी
गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला.
डोंगरी किल्ले : शिवरायांनी डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त
होती.किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता
निर्माण करणे सोपे जात असे . किल्ल्यावर अन्नधान्य व दारुगोळा यांचा
भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले ! मग किल्ल्यावरील शिवरायांनी
लहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन –दोन वर्षे दाद देत नसे.शत्रू
ताकदवान असला तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे .शिवरायांनी
स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही.
ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली व नंतर राजधानीसाठी रायगडाची
निवड केली,याचे इंगित हेच होते.
किल्ल्यांचे रक्षण : किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडांवर
भिन्नभिन्न जातीजमातींची माणसे नेमली.त्यामुळे किल्ल्यावरील
अधिकाऱ्यांचा एकमेकांवर वचक राही .कामे सुरळीत पार पडत.शत्रूला
किल्ल्यावर फुतुरी माजवता येत नसे .यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी
होती.
चौथाई : स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे
आवश्यक होते.शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा
उभारत .शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत,त्यास
चौथाई म्हणत.चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत.
चौथीचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
आरमारदल उभारले: सिद्दी,पोर्तुगीज,इंग्रज यांच्यापासून
स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे,हे शिवरायांनी ओळखले
होते,म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले होते.समुद्रात
सिंधुदुर्ग,विजदुर्ग यांसारखे भक्कम सागरी किल्ले बांधले.ते पाहिले
की आजही आपले मन थक्क होते.
स्वराज्यावर केवढी संकटे आली,पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने
आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले,म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.
उपक्रम :
तुम्हांला माहित असलेल्या दोन-तीन डोंगरी किल्ल्यांची माहिती मिळावा.